प्रीतसरी
प्रीतसरी
घन आले दाटून
आल्या पावसाच्या सरी!!
मन झाले वेडेपिसे
मनी बहरली प्रीतसरी
सख्याची वाट पाहे
अंग अंग शहारले!!
प्रीतीत तुझी राधा
अशी सख्या मोहरले!!
चाहूल लागताच तुझी
माझी मी न राहिले!!
तुझ्या स्पर्शाने प्रिया
मिलनास व्याकूळ झाले!!
आज प्रेमात न्हाले
अशी प्रीतसरी बरसली!!
ओलंचिंब मी झाले
प्रीत मनी बहरली!!
अंतरी लहर दाटली
आनंदाचे तरंग उमलले!
तुझ्या प्रितीत प्रिया
मनोमनी मी खुलले!!