STORYMIRROR

Yogesh Nikam

Romance

3  

Yogesh Nikam

Romance

प्रीतीचाप्राजक्त

प्रीतीचाप्राजक्त

1 min
239


प्राजक्ताचा सडा पडला गं अंगणी

दरवळ तुझ्या प्रीतीची भिडली अंतर्मनी..


तुलाच शोधत आहे चहूकडे माझ्या नजरा

माळून ठेवलाय मी तुजसाठी प्राजक्ताचा गजरा...


बेभान वार्या सवे गंध पसरला आसमंती

जणू काही तुझ्या येण्याची चाहूल या जगती...


प्राजक्त ही बहरतोय आता या चांदण्याराती

तुझ्या येण्याने जुळतील या रेशीमगाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance