प्रीत ही अबोली
प्रीत ही अबोली
प्रीत ही अबोली
धुंद सांज वेळी
सांग ना सख्या तू
का असा येतो अवेळी
डोळे माझे मिटता
भास तुझा होई
वाऱ्याच्या झुळकांतून्ही
सुगंध तुझा येई
मनाचे हे रितेपण
भरशील का साजना
प्रीत वेलीवर आपल्या
उमलेल का फुल सांग ना ?
प्रीत ही अबोली
तुझ्यात मी रमते
दोन डोळ्यात तुझ्या
मला स्वर्ग दिसते

