परी
परी
आयुष्याच्या रंग मंचकी
एक भेटली परी
ह्दय मंदिरी जाऊन बसली
तिच एकटी नारी
प्रथम पाहता त्या परीला
मन माझे तिजवर जडले
तिची नी माझी नजर जुळता
मन प्रेमामध्ये पडले
हास्य शोभते तिच्या मुखावर
सुंदर दिसते बट गालावर
ओठ गुलाबी तुझेच राणी
तुच मन मंदिरी
ह्दय मंदिरी जाऊन बसली
तिच एकटी नारी
केश तुझे ग काळेभोर
रुप तुझे ग चित्त चकोर
नजरेने मन चोरुन घेते
तुच नयन सुंदरी
ह्दय मंदिरी जाऊन बसली
तिच एकटी नारी
चालत येते ठुमकत छान
पाहुन तुजला हरपे भान
साद ऐकुनी मज प्रेमाची
कर हि इच्छा पुरी
ह्दय मंदिरी जाऊन बसली
तिच एकटी नारी

