प्रहार झाला
प्रहार झाला
बोलले कोणी टोचून किती
शब्दांचा तो वार झाला ।
सोसतो मी जरी वार आता
मनावरचं का प्रहार झाला ।
तुटले फुटले मनही आता
अंतरात एक विचार आला ।
शब्दांचेच बळ हे किती
शब्दांचा मग आधार झाला ।
जरी शब्दांनी शब्द वाढती
शब्द तिथे एक कामी आला ।
लागला जिव्हारी शब्द जेव्हा
शब्दांनीच तो मुकाट झाला ।