चाहूल उन्हाची
चाहूल उन्हाची
लागली चाहूल उन्हाची
पळसही झाला लाल ।
सोसेना ताप उन्हाचा
रंगांनी धरला ताल ।
अंगणी फुलला गुलाब
मोगरा ही दरवळला ।
झेलून चटका उन्हाचा
आंबा कसा मोहरला ।
आस मनात कशाची
जीवही किती तहानला ।
थेंब दिसेना पाण्याचा
गळाही आता व्याकुळला ।