STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

2  

Meenakshi Kilawat

Inspirational

प्रगतीचा आधार

प्रगतीचा आधार

1 min
2.6K


  पाखराला मनी कुणाची भिती 

चाहुल लागली त्यास प्रितीची 

भरवसा असते खऱ्या प्रेमावर

झेप बींदांस घेई आकाशाची

निळ्या, काळ्या घण मेघातून

पडे सरसर पावसाच्या धारा

निसर्ग सजला इंद्रधणु रंगाने

झाला मोकळा आकाश सारा

जीवन हे निसर्गाच्या आधीन 

असे सृष्टी त्यापासूनच चाले 

होता मोकळे आकाश इथे

मनी उल्हास सुंगधापरी फुले

मुलगी प्रगतीचा आधार वड असते      

नारी जन्माचा संर्वांनी आदर करावा

माता,बहिनी,प्रेमिका,पत्नी सर्व नारी

ती जन्मते तेंव्हा घरात उत्सव करावा......

मुलीची माया अपरंपार असते              नदी प्रमाने सर्व घांण वाहुन ती नेते

कधी शितला,तर कधी दुर्गेचा अवतार

प्रत्येक सिद्ध पुरुषामागे स्त्रीचा हात असते....

नारी तन-मन-धन देवून सर्वस्व अर्पिते 

त्याग,सहनशिलतेची ती मुर्ती असते 

नारी सासर-माहेरचा उद्धार करते

निरंतर दुसऱ्यासाठी ती जगत असते.......

या जगी कित्येक बहादूर मुली जन्मतात

कित्येक तारे पृथ्वीवर चमकत राहिले        झांशीची राणी,चितोडची पद्मिनी,इंदिराबाई

कल्पना,प्रतिभा या मुलींनी दाखवून दिले......

नारी नसेल तर उत्पत्ती होनार नाही

नारी नसेल तर नर जन्मा कसा येईल

प्रकृतिला ही नारीची उपमां आहे

नारी नसेल तर हे जग स्मशान होईल........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational