STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

4  

Chandan Pawar

Romance

प्रेमस्पर्श

प्रेमस्पर्श

1 min
24

माझ्या ओठांवर चढला

तुझ्या ओठांचा रंग..!

तुझा प्रेमस्पर्श होतांना 

शहारले होते अंग..!!


बिलगला देहास माझ्या

तुझ्या देहाचा गंध..!

तुला माझ्यात सामावतांना

स्पदनांचा आवेग बेधुंद..!!


तुझ्या रेशमी केसांमध्ये

फिरवताना माझी बोटे..!

तुझ्या डोळ्यात पाहतांना 

आकाश पडले थिटे..!!


लाजून अखेरीस तू

तुझ्या पापण्यांना मिटले..!

बांगड्यांचा खणखणाटात 

अंतर आपल्यातील संपले..!!


कोरत गेलो हृदयावर

मीलनाच्या त्या क्षणांना..!

वाटले काळानेही थांबावे

ते स्वर्गसुख अनुभवतांना..!! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance