STORYMIRROR

pranav kode

Romance

3  

pranav kode

Romance

प्रेमपत्र...

प्रेमपत्र...

1 min
870


माझ्या मित्राने मला सहज एकदा

एक प्रश्न सुंदर विचारला काय

हे कविता लेख म्हणजे दादा

तू कागदावर नक्की लिहितोस तरी काय


वाचताना किती सोप्प वाटत रे

पण लिहायला खरंच जमत नाही

म्हणजे प्रयत्न तसा केला नाहीय

पण तेवढा विचार करायलाही जमत नाही


प्रश्न साधाच होता त्याचा

पण उत्तर खरंच सुचत नव्हतं

तो तर अति आतुर होता

पण मला फक्त हसू येत होत


खूप सोपं असत रे सगळं

फक्त मनापासून तेवढं लिहायचं असत

असं सगळं मी मनातच बरळलो

कारण त्याच्यासाठी ते अवघडच होत


हिम्मत तर त्याची कमालच म्हणावी

म्हणाला शिकवणारे मलाही लिहायला

यमक वैगरे मी जुळवीन कसतरी

तू शिकव तेवढ्या भावना ओतायला


अभ्यास त्याचा शून्य होता

पण इच्छा मात्र खूप होती

माझ्याप्रमाणे त्याचीही सुरुवात

कदाचित शून्यापासूनच होत होती


हसत हसतच म्हणालो मी त्याला ,


वाचायला कविता शिकवायची असते रे

लिहायला शिकवू शकतच नाही

यमक शेवटी जुळवलं म्हणजे

कुणी कवी म्हणवला जात नाही


व्यक्त होतो रे मी तर फक्त

असं वेगळं काहीच लिहीत नाही

तुला वाटते ती जादू शब्दांची

वाचनाशिवाय जमतच नाही


कुणास ठाऊक का असं

जिथे पिकतं तिथे विकत नाही

लिहितात तसे सगळेच आपलं आपलं

पण विषय दिल्यावरच सुचत नाही


प्रयत्न केला त्यानेही मग

सुरुवात केली प्रिय शब्दाने

व्यक्त झाला तोही अन मग

प्रेमपत्रच सहज उमटले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance