STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रेमळ कुटुंब

प्रेमळ कुटुंब

1 min
202

कुटुंब प्रेमाचं आगर

माया वात्सल्याचं स्थान

हक्काचं विसाव्याचं घर

मनातलं आठवाचं स्थान  (१)


एकत्र कुटुंबात एकोपा

आजी आजोबांचं प्रेम

गाणी अन् गप्पागोष्टी 

असीम सुखाची ठेव     (२)


श्लोक शुभंकरोती

संध्याकाळी सांजवात

रामरक्षा भीमरुपी

पाठ होई बालवयात    (३)


विभक्त कुटुंबात मुले

अगदी एकटी पडतात

आई बाबांची वाट पहात

टी. व्ही. बघत बसतात   (४)


शिक्षण पूर्ण होताच

पाखरं उंच झेपावती

त्यांची वाट पहाताना

घरी डोळे पाणावती    (५)


मुलांनाही येते आठवण

संध्याकाळी कातरवेळी

कुटुंबापासून दूर आपण

गप्पा मारता डोळा पाणी  (६)


कुटुंब आपले आश्वासक

साथ यश अपयशातही

मान विश्वासाने ठेवता

आपुलकीने जवळ घेई    (७)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract