प्रेमळ बहीन
प्रेमळ बहीन
माझ्या प्रेमळ बहीणी
मी काय होणार तुझा रक्षक
आजुबाजूला पहायला
मिळतात नर हे भक्षक
माझी बहिण लाडाची
आहे फार मायाळू
तुझा भाऊ आहे त
तुझ्या सारखाच दयाळू
तुझ्या मुळेच कळलं
मला जिवनाचं सार्थ
दुसर्यासांठी तुझे आयुष्य
घालवू नकोस तु व्यर्थ
भांडत झगडत असलो तरी कधी
माझे प्रेम माझे होणार नाही कमी
हि देतो तुला सदा
मी जन्मोजन्मी ची हमी
संसाराचा गाडा चालवून
दुसर्यासांठी करतेस काबाड कष्ट
तुझ्या घामाच्या थेंबाने तुझ्या
आयुष्याती दुःख होऊ दे सारी नष्ट
तु माझी बहिण नसून आई आहेस
हाच आहे माझा ध्यास
तुझ्या शिवाय घेऊ नाही
शकत मी मोकळा श्वास
