प्रेमभंग....!!!
प्रेमभंग....!!!
घरासमोरच्या गच्चीवर रोजच दिसायची
एक दिवस नाही दिसली की जीवाची घालमेल व्हायची
केसांची बट सावरता तीने.. माझ्या काळजात धडधड व्हायची
पावसात भिजताना ती, माझे मन ओलेचिंब करुन जायची..!!!
कधीतरी मार्केटच्या गर्दीत दिसायची
बोलायची ईच्छा असूनही तीच्याशी बोलण्याची संधीच नाही भेटायची
बोलताना तीला बघून माझी बोलतीच बंद व्हायची
दिवसरात्र ती मला माझ्या आजूबाजूला असल्याची भासायची..!!!
अचानक ती दिसेनासी झाली
रंगवलेल्या स्वप्नांची रंग ऊडाली
तशी माझ्या डोळ्यावरची झोपच ऊडाली
तीला शोधण्यासाठी खुप शोधाशोध केली
पण शेवटी निराशाच पदरी पडली....!!!!
