प्रेमांकुर
प्रेमांकुर
नव दापंत्य जीवनात
प्रेमाचे बिजांकूर रूजले
दोन जीव एकतेत
नवे प्रेमांकुर फुलले
प्रेमाच्या परिक्षेला
श्रीहरीचा आशिर्वाद
पाण्यात प्रेमांकुर निघाला
ऐकत ब्रम्हांडाचा नाद
गर्भ जलात खेळतो
एक जिवंत बाळ
प्रेमाची शक्ती पहा
जमवे अणुरेणु संगे मेळ
आपल्या मऊ स्पर्शाने
बोले प्रेमाची भाषा
आई बाबांच्या हृदयात
जागवे आनंद अभिलाषा
सहनशीलता जागली
प्रेमाकुराच्या चाहूलीने
प्रसवपीडेच्या वेदना
क्षमल्या आनंदाने
अविस्मरणीय आनंद
प्रेम या संसारात
पूर्ण विश्वच व्यापला
एकमेकांच्या प्रेमात