भेट हवी
भेट हवी
1 min
223
भूवर किरण
जग प्रकाशित
अशी भेट हवी
जागवावी प्रीत
पराग मिलन
नव बीज देतो
फुलात सुगंध
जसा एक होतो
नदी जीवालागी
धावत वाहते
सागर प्रेमात
बंधन तोडते
अशी भेट हवी
दूध आणि पाणी
अमर राहावी
दोघांची कहाणी