प्रेमांकुर
प्रेमांकुर
प्रेम अंकुरले मनी
ह्रदयात जोपासले,
संग तुझ्या आनंदाने
मन प्रितीत फुलले.
गाणे मधुर तराणे
शब्द गुंफून गायले,
वेड्या मनातले गुज
ओठांवर बहरले .....१
प्रेम राग आवळता
मन कासाविस झाले,
नयनात सख्या माझ्या
भाव तुझे उमटले.
प्रितीतल्या भावनांनी
काळजाला स्पर्श केले,
तुझ्या प्रेमाने मनाला
अधिकच फुलवले.....२