प्रेमांकुर
प्रेमांकुर
1 min
244
मी न माझी राहिले दृष्टीस तू पडताना
भेट अनोळखी नेहमीच जवळ तू नसताना
खंत एकच की नाही भेटलो प्रत्यक्षात
मैत्रीचे लेबल लावून झाली होती सुरुवात
अजाणतेपणी तूही मान्य केलंस आणि हसलीस
रिक्त ओंजळीत माझ्या जणु प्राजक्ताचा सडाच पाडला
प्राजक्ताच्या सुगंधाने मोहरून गेले माझे अंगण
दुराव्यातुनच जवळीक साधत सजले नभ-तारांगण
कळ विरहाची त्याच्या काढतो वळीव
मन शिळा होई त्याचे अन् हासणे कोरीव
आठवणींच्या सरीत त्याला भिजवते कित्येक वेळा
तो ठक्क कोरडा होतो जसा पोकळ मेघ सावळा
झिरपू दे जरा मनात हा वरवरचा ओलावा
मग त्यालाही किंचित जाणवेल नको हा दुरावा