रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
1 min
344
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
ताल, सूर, राग लेवुनी छंद माझा आगळा
आगळ्या या छंदात नख-शिखान्त भिजताना
आपसुकच जुळल्या आलापींच्या सुरेल ताना
तानेत तान गुंफून उमलले नवीन गीत
गहिवरलेल्या शब्दांनी शिकवली जगाला रीत
सूर ऐकताच दंग झाला हरी माझा सावळा
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
छंदात दंगले मी, छंदात गुंतले मी
होऊनी बेभान घेतली भरारी मी
आधी होते सुरवंट झाले आता पाखरु
उडण्याचा मोह कसा मी आवरु
पाय रुतलेले जमिनीत नजर भिडली आभाळा
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा