आस भेटीची
आस भेटीची

1 min

12K
चाहुल तुझी हळुवार
भासे सर श्रावणी
अन् दृष्टीस तू
एकाएकी दर्पणी
धीर करून शब्द
परि ओठांशी धाडले
विरले कसे हवेत
क्षण दोघांत गोठले
तुझे मुक्याने राहणे
मग जिव्हारी लागते
अधिर-मन जाहले
चांदणे दोघांतले
नको तोच पुन्हा
खेळ लपाछपीचा
नव्याने मांडु डाव
आपल्या सारीपाटाचा
नको पुन्हा वर्दी
मागच्या चुकांची
वादळ भयंकर
उंब-याशी थांबले
अभिशाप असे तिला
अघोरी ग्रहणाचा
नको हट्ट मग
चंद्र-पौर्णिमेचा.