मराठी
मराठी
कधी रांगते कधी सांगते गाथा शौर्याची
कधी गाजते कधी वाजते जणु तोफ राजमाची
कधी मवाळ कधी वेल्हाळ लेखणीतुनी झरते
कधी वर्षते कधी हर्षते मन्मनी उत्स्फूर्त बहरते
कधी नितळ कधी खळखळ पाण्यासम वाहते
कधी आव्हान कधी तहान शुभ्र दुधाची भासते
कधी अंगार कधी शृंगार जणु शोभते माल्हन
कधी मंदार कधी गंधार रुणझुणते पैंजण
कधी गुंजते श्वासांतुन कधी शब्द-समशेरी ओठी
झंकारते स्वप्न राज्याचे जिथे स्वर रुळती 'मराठी'