STORYMIRROR

POONAM PARAB

Others

4  

POONAM PARAB

Others

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा

1 min
43

बहर आला सृष्टीस आणि 

सुख मनात नाचु लागले 

थेंब सरींचे पडताच 

कवितांचे झरेही वाहु लागले 

वाफाळलेला चहा आणि खिडकी 

हे एक वेगळेच समिकरण

बसुन पाऊस पाहताना

होईल स्वतः चे ही विस्मरण 

काहिली अंगाची क्षणभर शांत झाली 

कुण्या गंधीत वा-याने थंडीची शाल ओढली

कागदी होड्या निसटून गेल्या 

कधीच मुलांच्या हातुन

रोपे आली त्या जागी

रुजव्याच्या मातीतुन

'ये रे ये रे पावसा' म्हणता

आलास खरा धावुन

गडप नको होउ मध्येच 

संपला आता जून


Rate this content
Log in