साकडे
साकडे
1 min
12.2K
लेकुरे तुझीच सारी
वाहती काय तुझ्या चरणी
हात घेतले हाती
पाठवण्या का कुणा सरणी?
दिलीस तू समान बुद्धी
नाही तरी विचारांची शुद्धी
उधळली कुमने एकमेकांवर
परी भेदाभेद मंगळ?
एक रंग वाहतोची रगारगात
तरी वर्ण-भेद चराचरात
ग्रहण लागले अखंडीत
मानवतेसी!
साकडे हे आता तुजसी
जावो भेद लयासी
सुमने गुंतावी ही
एकमेकांत!