प्रेमाच्या अनमनीय दिशा...
प्रेमाच्या अनमनीय दिशा...
प्रेमाच्या अनमनीय दिशा...
पहारा हा दुनियेचा ,
त्यात ओढल्या किती रेषा,
मर्यादा नाही या उबंरठ्याला ,
स्वच्छंदी हळव्या पाखराला,
झेप घ्यायला किती बंधनात ठेवतील,
प्रेमाच्या अनमनीय दिशा...
न कळत जडतो ,
मनाला हा साज ,
श्रृंगार याच्या भावनेला,
खोल खोल अंतरंगात ,
भान हरपून रमतो ,
कुठे ठाऊक असते त्याला,
कोणती वाट दाखवणार त्याला,
प्रेमाच्या अनमनीय दिशा ...
आडवाटेने जातांना ,
कृष्ण बोलवतो यमुना तिरी ,
बासरी घालते अशी हाक,
ती राधा कृष्णमय होते,
लपत छपत कृष्णास भेटते ,
निस्सीम प्रेम त्यांचे तरी ,
वाट्याला येतात ,
प्रेमाच्या अनमनीय दिशा...
