STORYMIRROR

Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

3  

Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

प्रेमाची प्रतीक्षा

प्रेमाची प्रतीक्षा

1 min
196

प्रेमाच्या प्रतीक्षेत धुंद मी, अलवार तिच्या नजरेत विझत असतो, प्रेमाच्या या हृदयाच्या धगधगत्या निखाऱ्यात मी नेहमीच जळत असतो....

गारव्याची लहर ही हळुवार येते,राहिल्या, उरल्यासुरल्या आठवणींना सोबत घेऊन जाते.... 

कातरवेळी तिच्या विचारांत गुंतलेला मी, माझ्या माझ्यातच हरवत असतो.... का कोण जाणे, आमच्या प्रेमाला कोणाची नजर लागली..... 

आजही त्या आसुसलेल्या वाटेवर, वाट पाहतोय तिच्या येण्याची, तिची माझ्यात... हरवून जाण्याची... 

भेटण्यातली प्रतीक्षा आहे फार उत्सुकतेची,त्या नभातल्या चांद, ताऱ्यांनाही जणू लागलेली आस आमच्या मिलनाची... 

प्रतीक्षेत या प्रेमाच्या मी अखंड वाहवत गेलो, आयुष्याच्या या क्षितिजावर साथ तुझी शेवटपर्यंत देत गेलो.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract