प्रेम
प्रेम
वाटते मला नेहमी
व्हावे वाऱ्याची झुळूक
हळुवार तिच्या गाली
लागुनी जावे हळूच
मन धुंद वाऱ्यात
गाणे गावे प्रेमाचे
बीज फुलावे दोघांत
प्रेमबंध नाते प्रितीचे
सदासर्वदा मी व्हावा
तिच्या क्षणाचा सोबती
पावलोपावली वाढावी
तिच्यासोबत माझी संगती
बघताच क्षणी मला
ती दिसावी लाजरी
चेहऱ्यावर तिच्या फुलावी
कळी नाजूक हसण्याची
असे हे प्रेम आमुचे
दिसावे जगापरी वेगळे
प्रेमाच्या नात्यात आमुच्या
सुख यावे सदा सगळे

