STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Inspirational Others

3  

Rohit Khamkar

Tragedy Inspirational Others

प्रेम

प्रेम

1 min
253

काल हवे हवेसे वाटणारे, आज नको नकोसे झाले.

जवळ असणारेच अलगद, नको ते बोलून गेले.


बरं बोलणं ते कोनाला, जो अजून नाहीच आहे तो.

मान सन्मान ज्याच्या नावाला, जन्मापासून भिणार का तो.


भिती ती कोणाची, आपली की आपल्या माणसांची.

आयुष्याचं ओझ उचलून, रीत आयुष्य जगण्याची.


जन्मा पासून हेवा वाटे, भोग सारे वाट्याला.

बोचताना तो विचार कसला, वाटेवरच्या काट्याला.


भिती आहे उद्याची, तूही होशील का गुलाम.

प्रत्येकाला इथं मानसन्मान, नियम नाही समान.


कायदा कागदावर सगळ्यांना एक, फरक लागू करताना.

सुटल्याचं समाधान होतं, कमजोराचा जिव जाताना.


सत्ता हातात तुमच्या, तुम्हीच झालात सरकार.

लक्ष देऊन दुर्लक्ष नका करू, नाही तर दिसेल सारा तिरस्कार.


झालं गेलं सोडून द्याव, जगावं मोठ्या मनाने.

आयुष्यात सगळं मिळून जाईल, फक्त बोलणं ठेवा प्रेमाने.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy