प्रेम व पाऊस
प्रेम व पाऊस
आला पाऊस भिजली धरित्री
वीज कडाडली नभी त्या रात्री
अलवार आला शिरशिर वारा
बरसू लागल्या प्रेम धारा
भिजलो मी ही भीजली मैत्री
रात किड्यांचा कीर्र कीर्र नाद
मैत्री मधुनी अवचित साद
साद बिलगला मंद धुंद
अलगद उघडली मात्र छत्री
सरीवर सरी भिजले आंगण
टपटप धारा हिरवे पान
प्रेमवीरा दिधले अंदण
स्फुलिंग चेतना शरीर गात्री
आला पाऊस सजली धरती

