STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

प्रेम तुझे माझे

प्रेम तुझे माझे

1 min
2.8K


प्रेम तुझे माझे

तुझ्याच सोबत पहाट व्हावी

तुझ्या सवे सख्या रात्र

तू जा माझ्यासवे वितळून

की ओले व्हावे गात्र

तू सकाळी उठूनी

माझे कोरड़े ओठ चुंम्बावे

भिजवून टाकावे असे की

मी ती पित राहावे

तू व्हावा सागर माझा

मी तुझीच सरिता

अन् तू मिसळावे माझ्यात

प्रत्येक स्पर्शा करीता

असे हे मनोमिलन

आयुष्यभर तू मी जपावे

होऊन साथी सुख दुःखा चे

संगतीने मिरवावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance