प्रेम सिकंदर
प्रेम सिकंदर
तुझ्यात गुंतलो मी असा
की झालोय प्रेम सिकंदर
जाणार सर्व रिते तरीही
करतोय मी प्रेम निरंतर
कोणा दुसऱ्यासाठी आज
केले निर्माण आपल्यात अंतर
कळेल माझ्या प्रेमाची किंमत
त्याने तुला सोडल्यानंतर
तू गेली सोडुन मला तरीही
रमतोय मी आठवणीत मधुर
कळता नाही तू संग माझ्या
वाटे मलाच मी आज विदुर
चाललो इथून मीही आता
सोडुन सर्वांना खूप दूर
लागली जरी काळजाला आग
निघणार नाही प्रीतीचा धूर
ते दुःख मिळालेले प्रेमात
भासे मज अती भयंकर
तरीही करतोय प्रीत अजुनी
आणि करणार मी निरंतर
