STORYMIRROR

vaishnavi chavan

Romance

3  

vaishnavi chavan

Romance

प्रेम शब्दांत सांगायचं नसतं..

प्रेम शब्दांत सांगायचं नसतं..

1 min
120

सारं काही शब्दांत सांगायचं नसतं, 

थोडं नजरेनेही कळू द्यायचं असतं..


सारं काही स्पष्ट बोलून दाखवायचं नसतं, 

थोडं कोड्यातही पाडायचं असतं..


असंच, दरवेळी प्रेम फक्त 

त्यानेच व्यक्त करायचं नसतं, 


कधी तरी आपणही थोडं स्पर्शातून, 

थोडं मिठीतून प्रेम जाणवू द्यायचं असतं..


कारण प्रेम फक्त शब्दांत सांगायचं नसतं..

थोडं नजरेनेही कळू द्यायचं असतं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance