STORYMIRROR

Sanjeev Borkar

Romance Others

4  

Sanjeev Borkar

Romance Others

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

1 min
187

प्रेम म्हणजे काय असतं

जे मनाच्या गाभाऱ्यात फुलतं

डोळ्यांच्या पापण्यात झुरतं

आणि हृदयात मुरतं

ते प्रेम असतं


प्रेम म्हणजे अतूट विश्वास 

एकमेकांचा श्वास असतं

जे असंख्य नद्या मिळून

शेवटी सागराला मिळतं

ते प्रेम असतं


प्रेम म्हणजे निळे आकाश

जेव्हा काळे ढग भरून येतं

आणि सोनेरी सरीत अलगद

मातीला हळूच बिलगतं

ते प्रेम असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance