STORYMIRROR

Sakshi Raut

Romance

3  

Sakshi Raut

Romance

प्रेम म्हणजे काय असतं... !

प्रेम म्हणजे काय असतं... !

1 min
346

प्रेम म्हणजे काय असतं..

एका प्रियकराने प्रियसीला

दिलेलं गुलाबाचं फुल असतं..ll

एका अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकताच..

आपल्या ओठांवर हसू येनं..

म्हणजेच प्रेम असतं.. ll

आपल्या धडधडत्या हृदयात

एका अनोळखी व्यक्तीची प्रतिमा जपणे..

म्हणजेच प्रेम असतं.. ll

अचानकच चुकून ती व्यक्ती समोर आली की.,

सारेच शब्द निशब्द होने....

म्हणजेच प्रेम असतं.. ll

त्याच्या चेहऱ्यावरच हसू पाहुन....

आपणही खडखडून हसणं..

म्हणजेच प्रेम असतं... ll

त्याला दुःख झालं की

आपले डोळे पानावानं ...

त्याच्या भविष्याच टेन्शन...

आपलं टेन्शन समजनं...

म्हणजेच प्रेम असतं... ll

ऑनलाईन च्या जमान्यात..

त्याचा लास्ट सीन चेक करत...

त्याच्यावरच कविता लिहिनं...

म्हणजेच प्रेम असतं... ll

रात्री झोपताना त्याची चॅटिंग वाचून..

मनातल्या मनात हसून...

रात्र रात्र त्याची रिव्हिजन मारण...

म्हणजेच प्रेम असतं... ll

आणि... शेवटी म्हणजे त्या..

साऱ्या कविता त्याच्यावरच होत्या...

हे न सांगताच त्यालाच फॉरवड करणं...

म्हणजेच प्रेम असतं.....

म्हणजेच प्रेम असतं..... ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance