STORYMIRROR

Sakshi Raut

Tragedy

3  

Sakshi Raut

Tragedy

अश्रुंना विसरवणारा बटमोगरा...

अश्रुंना विसरवणारा बटमोगरा...

1 min
11.8K

गीत लिहितांना अश्रूंचे

हसू होते तिच्या गालावरती...,

आणि... बटमोगऱ्याचा सुगंध दरवळावा...

असे शब्द होते तिच्या पेनीवरती.. ll

ती लिहीत जायची...

अन.. शब्द मात्र हसत जायचे...,

मग... काय कुणास ठाऊक

शब्दात शब्द गुंफुन..

एकमेकांच्या प्रेमात पडायचे... ll

मग काय...

तर, बटमोगराही रुसून बसायचा

अन, त्या शब्दांच्या घेऱ्यावात जाऊन अडकायचा.. ll

फुले कोमेजायची अन पाकळ्या मात्र..

सुगंधीत होऊन... पुनच्छ

परागकणांच्या स्वप्नातच जाऊन पडायच्या..ll

मग.. स्वप्नस्वप्नात बदल व्हायचा..,

कुणी गुलाब, कुणी मोगरा तर..

कुणी जास्वंद व्हायचं...

आणि...

मग फुले होऊन सारीच..

तिच्या अश्रुंना विसरायला भाग पडायचे...

त्यातच बटमोगरा हा प्रभावी ठरायचा..

...त्यातच बटमोगरा हा प्रभावशाली ठरायचा.. ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy