STORYMIRROR

Sakshi Raut

Romance

3  

Sakshi Raut

Romance

तुझं येणं...

तुझं येणं...

1 min
12.3K

तुझ्या पाऊलखुणा

आयुष्यात झडकल्यावर..

सुरुवात केली लिखाणाला.. ll


तुझ्यात गुंतत गेले

तेव्हा खऱ्या अर्थाने

मी लागले कविता करायला.. ll


क्षणोक्षणी तू आठवत राहिलास

अन क्षण जपूनच मी

लिहायला लागले... ll


मग तू भेटलास..

आणि... मी खऱ्या अर्थाने

तुझ्यावरच कविता करायला शिकले... ll


सुचता सुचता शब्द मनातले..

त्यात.. तूच उमजत गेलास...

मग... काय झालं काय माहित


आणि... खऱ्या अर्थाने...

तूच मला कविता शिकवू लागलास...

मग... तूच मला कविता शिकवू लागलास..।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance