STORYMIRROR

Pandit Warade

Romance Thriller Others

3  

Pandit Warade

Romance Thriller Others

प्रेम कहाणी

प्रेम कहाणी

1 min
265

गंध ओलेत्या मातीचा

आला घेऊनिया वारा

मेघ  गर्जना  करती

संगे पावसाच्या धारा


रान सारे ओले झाले

झाडपाला ओलाचिंब

दिसे वाहत्या पाण्यात

आभाळाचे प्रतिबिंब


होती ओलेत्या अंगाने

नार उभी आडोशाला

मन  उंडारलं  खोंड

कसं सावरावं त्याला


मन भारीच ओढाळ

नको तिकडे पळते

काया भिजली पाहून

पुन्हा  नजर  चळते


होता  नजरा  नजर

सखी हळूच लाजली

खळी गालाची पाहून

कळ  हृदयी उठली


गूढ  भाषा  नजरेची 

तिला कशी उमगली

आम्र वृक्षाच्या साक्षीने

प्रेम  रसात  भिजली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance