STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Classics

3  

Asmita prashant Pushpanjali

Classics

प्रेम काय आहे?

प्रेम काय आहे?

1 min
163


प्रेम काय आहे?

दोन ह्रदयााचे आवाज,

दोन ह्रदयााचे मिलन,

दोन ह्रदयााचे स्पंदन,

की दोन ह्रदयााचे गीत।१


प्रेम काय आहे?

दोन डोळ्यांचे जागरण,

दोन डोळ्यांची स्वप्ने,

दोन डोळ्यांचे अश्रू,

की दोन डोळ्यांची कटाक्ष।२


प्रेम काय आहे?

सोबत चालने,

चालतांना सोबत करणे,

केलेली सोबत दुरवर करणे,

की अखंड हातात हात घेवून चालणे।३


प्रेम काय आहे?

वाटेत थांबणे,

थांबून चालणे,

दूूर दूूर मागे वळून पाहणे,

की क्षितीजापार जाऊन थांबणे।४


प्रेम काय आहे?

झोपेत आठवणे,

आठवत झोपणे,

आठवून झोपेतून उठने,

की झोपेतून उठून आठवत बसणे।५


रागवून ही विसरणे,

विसरूनही आठवणे,

आठवून कुशीत शिरण्याचा भास होणे,

हेच का प्रेम असते?|६


नाही! कदाचीत याही पलिकडे,

नाहीच मोजता येत प्रेमाची व्याप्ती,

शब्दात, वचनात, आलिंगनात,

भावनिकतेच्या, कल्पकतेच्या।७


सीमेपार असते प्रेमाचे आलय,

कधी रुसव्यात,

कधी हसव्यात,

कधी फसव्यात।८


स्वार्थाच्या पल्याड,

त्यागाच्या आकाशात,

संकोचाच्या कोशा बाहेर,

निर्भीडतेचे पंख देते,

ते प्रेम।९



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics