प्रेम अंतरीचे...
प्रेम अंतरीचे...
सोनेरी साज घेऊनी
जीवनात प्रभा हसली
नवचेतना मनी जागवुन
अंगणात ऊन्हे बहरली
मोहक हळव्या कमानी
खुलल्या दशदिशांत
चांदण्याच्या कोपरखळ्यांनी
प्रीत रुजली मनात
चहुकडे पक्षी गाती
गीत नव्या ऋतुंचे
तुझ्या प्रितीचे रंग
सागंती अर्थ सुखाचे
तुझी नजर भुलवी
जगण्याला येई भरती
मन ऊगीच अधीर होई
प्रीतीच्या वळणावरती
प्रीत तुझी मखमली
होई मी बेधुंद
दरवळे माझिया अंतरी
तुझ्याच श्वासाचा गंध
दरवळे माझिया अंतरी
तुझ्याच श्वासाचा गंध

