STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

प्रेम आईचे..

प्रेम आईचे..

1 min
186

जी जवळ नसतांना देखील

तिच्या प्रेमाची ऊब तेवढीच जाणवते

ती आई असते..


जी हजारो मैलांवर असुनही

तिच्या आवाजामधलं प्रेम तेवढेच प्रखर ऐकु येते

ती असते आई..


सुखाचे सागर कायम तिच्या हृदयात दाटते

मुलांसाठीचे प्रेम कायम मनात साठते

ती आई असते..


आजारपणात आपल्या औषधांपेक्षाही

तिच्या प्रेमाने बरे वाटते.

ती आई असते.


जिच्या प्रेमाने सजते सारे आयुष्य

आई म्हणजे घराचे मांगल्य..


जगात एकमेव निस्वार्थ प्रेम करणारी

फक्त आईच असते..


प्रेम किती सुंदर कल्पना असते

हे आईच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from दिपमाला अहिरे

Similar marathi poem from Inspirational