प्रारब्ध
प्रारब्ध
मी माझा नव्हतो
नव्हतो कोणाचा
खेळ खेळत गेलो
जसा मांडला डाव
कोणी नव्हते पाठीशी
नसे कोणता आधार
मोहाचे पाश आवळता
त्यात गुंतला प्राण
लाचारीचा गडद रंग तो
हातावरती चढतो, माझ्या
दुष्कर्माचे फळे भोगतो, सोसतो
काळाचे अगणित घाव
अगतिकतेच्या अग्नीत
धुमसते, प्रायश्चित्ताची आग
जळतो, पोळतो, उरतो,
पहातो, प्रारब्धाची वाट
विनीता देशपांडे
