पोवाडा (स्वरचना)
पोवाडा (स्वरचना)
1972सालाला, नाशिक जिल्ह्याला
निफाड तालुक्याला, मांजरगावाला
सुंदराबाईच्या पोटी पुत्र जन्माला
संजय नाव ठेवले बाळाला
सोनवणे आडनाव कुळीला जी जी जी
दुष्काळात हलाखीत जगण्याला
रघुनाथ पिता दुष्काळी कामाला
त्यात जगण्याचा प्रश्न महाराष्ट्राला
त्यात पुत्र संजय वाढू लागला
सत्त्वपरीक्षा होती जगण्याला जी जी जी
गरीबीचे चटके कुटुंबाला
निरक्षर कुटूंब मांजरगावाला
शिक्षणाचा गंध नाही कुटुंबाला
एक बहीण होती संगतीला
दुष्काळात तिचा अंत झाला जी जी जी
जगण्यात दुःखाचा घाला
दुष्काळात एक बळी गेला
अल्पभूधारक शेतकरी गावाला
मजूरीशिवाय पर्याय नाही उरला
डांबरी रस्त्याचे कामे गावाला जी जी जी
तप्त उन्हाचा कहर धरतीला
आईबाप मजूरीच्या कामाला
दोन भावंडे होते संगतीला
दोन वेळचा प्रश्न जगण्याला
चकीतले पीठ होते खाण्याला जी जी जी
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळाला
शाळेत उपासीपोटी शिकू लागला
सुट्टीच्या दिवशी मजूरीने राबला
शेतमजूर आईबापाच्या जोडीला
संजय लागला बांधकाम मजूरीला जी जी जी
संजयला संघर्ष नशिबाला
शिक्षणाची जिद्द हो त्याला
शिक्षणाचा ध्यास घेतला
माध्यमिक शिक्षण गावाला
व्ही.एन.नाईक माध्यमिक शिवरे गावाला
डी.एड.शिक्षण परेल मुंबईला करण्याला जी जी जी
गाव सोडले शिक्षण करण्याला
उपासीपोटी डी.एड.करण्याला
ताडदेव मुंबई फूटपाथ रहाण्याला
भिकारी जीवन आले वाट्याला
त्यातच कोर्स पूर्ण त्याने केला जी जी जी
शिक्षकाची नोकरी मिळाली मुंबईला
इंडियन एज्यूकेशन संस्था आधाराला
नोकरीत कार्यकाळ चालला
पुढे पदवी शिक्षण घेण्याला
उच्च शिक्षण ध्यास पूर्ण झाला
बी.ए.मराठी विषय घेण्याला
साहित्यिक जीवनास आधार झाला जी जी जी
पत्नी मंगलाशी विवाह झाला
दोन पुत्र आली जन्माला
शिक्षणाचा ध्यास घेतला
त्यातला एकसिविल इंजिनीअर झाला
पाटबंधारे खात्यात नोकरीला लागला जी जी जी
संगीताची आवड दुसर्याला
नवनवी वाद्य वाजू लागला
कलेचा वारसा घरात लाभला
संजय कवीता,गाणी गाऊ लागला
छंद मनाचा पूर्ण त्याने हो केला जी जी जी
छंद संजयला साहित्याचा जडला
कथा,कविता पुस्तके ध्यास लिहिण्याला
अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला
आदर्श शिक्षक पुरस्कार नाव लौकीकाला
जगण्याचे सार्थक लाभले जीवनाला जी जी जी
मुंबईला वास्तव्यास रहाण्याला
गरीबीचे भान कुटुंबाला
जाण ठेवतो गरीबीची मदत करण्याला
आपल्यासारखे जीवन नको दुसर्याला
एव्ह्ढी गरीबी नसावी नशिबाला
प्रेरणा म्हणून सांगतो पुढील पिढ्यांला जी जी जी
छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले आंबेडकर
संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत भगवान बाबा यांचे विचार
त्यांचे झाले संस्कार संजयच्या जीवनावर
साने गुरुजी आदर्श त्यांचे त्यांचा अविष्कार
स्वामी विवेकानंद आहे त्यांची विचारधारा प्रेरक
या सर्वांतून संजय घडला एक आदर्श शिक्षक.जी जी जी
