STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Children

पोवाडा-एपीजे अब्दुल कलाम

पोवाडा-एपीजे अब्दुल कलाम

1 min
232

धन्य, धन्य, एपीजे अब्दुल कलाम 

तुम्हा सलाम 


रामेश्वरम पवित्र स्थानाला 

1931सालाला 

बाळ एपीजे अब्दुल कलाम जन्माला 

गरीबीचा काळ भयंकर कुटुंबाला 

संघर्ष त्यांच्या जीवनाला! जी जी जी 


संस्कारी कुटूंबात बालपण 

कष्टावर त्यांचे जीवन 

लहान वयात कष्ट सोसून 

गरीबीत चाले शिक्षण! जी जी जी 


जिद्द, चिकाटी, स्वभावगुण 

जीवनात ध्येय ठरवून 

अभ्यासात मन लावून 

तांत्रिक घेतले उच्च शिक्षण! जी जी जी 


धरतीमातेला सुपुत्र मिळाला 

भारतमातेच्या रक्षणाला, देशकार्याला 

बहुमान भारताचे शास्रज्ञ होण्याला 

देशाची क्रांती करण्याला! जी जी जी 


देशाचे महान शास्त्रज्ञ 

मिसाईल शास्त्रज्ञ 

अणुशास्रज्ञ, महान तज्ज्ञ 

आम्ही भारतीय कृतज्ञ! जी जी जी 


भारताला नवी दिशा देण्याला 

भारताचा विकास करण्याला 

भारताची ताकद वाढवण्याला 

शत्रूला जरब बसविण्याला! जी जी जी 


दाविली ताकद जगाला 

बहुमान मिळाला भारताला 

भारताची मान उंचावण्याला

 शोध क्षेपणास्रान्चा यशस्वी झाला! जी जी जी 


मिसाईलचे थोर जनक 

भारताचे महाशोधक 

सत्यशोधक, अंगीकारक 

आधुनिक विज्ञानातले शिल्पक! जी जी जी 


विविध ध्येय त्यांच्या मनात 

त्यांच्या स्वभावात, त्यांच्या बुद्धीत 

त्यांच्या कर्मात, त्यांच्या हृदयात 

त्यांच्या रक्तात! जी जी जी 


बालमनाची त्यांना आवड 

ज्ञान देण्याची त्यांची धडपड 

बालमनाची त्याना ओढ 

बालकार्याचे त्यांचे वेड! जीजीजी 


हाडाचे होते शिक्षक

भारताचे जिवंत विचार लेखक 

अनेक शोध, उपक्रमाचे जनक 

भारताचे थोर समाजसेवक! जी जी जी 


वृक्षप्रेमी, बालप्रेमी, देशप्रेमी 

अध्यापक, अध्यापनाचे प्रेमी 

राष्ट्रीय एकता, एकात्मता प्रेमी 

महान सैनिक प्रेमी! जी जी जी 


त्यांच्या कार्याची ठेऊन आठवण 

भारताच्या राष्ट्रपती विराजमान 

देऊन भारतरत्न सन्मान 

राखली त्यानी भारताची शान! जी जी जी 


आठवण त्यांच्या स्मरणार्थ 

गाजविला त्यानी पुरुषार्थ 

क्रांती विचाराचा समजून अर्थ 

वाचन दिन प्रेरणा सार्थक! जी जी जी 


शाहिर संजय सोनवणे गातो पोवाड्याला

मांजरगावाला, निफाड तालुक्याला 

नाशिक जिल्ह्याला, महाराष्ट्र राज्याला

भारत देशाला! जी जी जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract