पोवाडा-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
पोवाडा-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
धन्य,धन्य महामानवाला
वंदूनी त्यांच्या चरणाला
त्यांच्या महान यशोगाथेला
त्यांच्या विश्व कार्याला जी,जी,जी
14एप्रिल 1891सालाला
मध्यप्रदेश या राज्याला
महू या गावाला
बाबासाहेबांचा जन्म झाला जी जी जी
भाग्य लाभले महाराष्ट्राला
पुत्र झाला भिमाबाईला
रामजी पित्याला,सुभेदाराला
आंबेडकर आडनाव शोभे कुटूंबाला जी जी जी
भाग्य लाभले महाराष्ट्राला
रत्नागिरी जिल्ह्याला,दापोली तालुक्याला
आंबावडे गावाला,प्राथमिक शिक्षणाला
भारत भूमीच्या सुपुत्राला जी जी जी
हायस्कूल,पदवीचे शिक्षण मुंबईला
एल्फिस्टन हायस्कूल,कॉलेजला
एम.ए.चे शिक्षण कोलंबिया अमेरीकेला
पुढील शिक्षण घेउन इंग्लडला
अर्थशास्र,कायदा शिक्षण घेण्याला जी जी जी
सयाजीराव गायकवाड मदतीला
परदेशी शिक्षण शिष्यवृती देण्याला
इंग्लडहून डी.एस्सी.पदवी मान मिळविला
असे पदव्या विभूषित रत्न देशाला जी जी जी
अस्पृश्यता निवारण्याचे कार्य महाराष्ट्राला
महाड चवदार तळ्याचे पाणी पिण्याला
माणसाला माणूस हक्क देण्याला
छत्रपती शाहू महाराजांनी सन्मान केला जी जी जी
थोर समाजसुधारक,विचारवंत महाराष्ट्राला
शिक्षणतज्ज्ञ,कायदेपंडीत देशाला
उत्तम वक्ते,लेखक,देशकार्याला
सखोल अभ्यासक,संपादक,महाराष्ट्राला जी जी जी
मूकनायक पाक्षिक समाजजागृतीला
त्यातून समाजप्रबोधनाचा अंगीकार केला
वाचा फोडली,अन्यायकारक प्रवृत्तीला
जरब बसविला पशूसमान वागणूक देणाराला जी जी जी
14 ऑक्टोबर 1956 सालाला
धर्मांतर करण्याचा विचार आला
हजारो अनुयायी घेऊन संगतीला
बौद्ध धर्मात धर्मांतर नागपूर दिक्षा भूमीला जी जी जी
अर्थ जगण्याला संविधानाने दिला
बाबासाहेब कायदामंत्री भारताला
प्रजासत्ताक भारत निर्माण झाला
राज्यघटनेचे शिल्पकार बहुमान थोर रत्नाला जी जी जी
देशाच्या स्वातंत्र्यात वाटा उचलला
मसुदा समितीचे अध्यक्ष देशाला
हेवा वाटला सार्या विश्वाला
न भूतो न भविष्यति देशाला
राज्य घटना अर्पिली भारताला जी जी जी
तळागाळातील शोषितांचा उद्धार केला
सर्व जाती धर्माला न्याय दिला
जीवन वाहिले मानवजातीला
भारतरत्न सन्मान शोभे महामानवाला जी जी जी
