STORYMIRROR

Sanjay Chhaburao shelke

Inspirational

3  

Sanjay Chhaburao shelke

Inspirational

पोटगी

पोटगी

1 min
178

कायद्यानं केलेल्या छळाची व्यथा, आज ओठापर्यंत आली. 

नाटक लग्नाचं करून, कोडगी-पोटगी मागायला आली...... 


ठरवलेल्या ध्येयासाठी

डाव तिनं खेळला होता... 

पूजा करावी ज्याची त्यालाचं

उंदरासारखा छळला होता. 

कुटाळखोर-करता येतील तितकी, 

नाटकं करून गेली. 

नाटक लग्नाचं करून, 

कोडगी.... पोटगी मागायला आली... 


पुरूष म्हणून जन्माला आला, 

हिच त्याची चूक होती. 

पाणावलेल्या डोळ्यांमध्ये

अबोल वेदना मूक होती.... 

धीर खचला, काळीज तुटलं. 

घेऊन सगळं गेली..,....

नाटक लग्नाचं करून -

कोडगी.... पोटगी मागायला आली. 


सोगांड्याच्या सोगांसारखा

मांडलेला संसार होता... 

आतून-बाहेरून नाटकीपणा. 

होता, फक्त व्यवहार होता. 

नातं, प्रेम, विश्वास सगळं, 

बाजारात विकून गेली. 

नाटक लग्नाचं करून, 

कोडगी... पोटगी मागायला आली. 


सावित्री, सती, पतिव्रता

फक्त गोड शब्द आहेत. 

फसवणारे खूप आहेत... 

अन् फसणारे स्तब्ध आहेत. 

महान आत्मा.... 

महानतेलाही महान करून गेली

नाटक लग्नाचं करून... 

कोडगी... पोटगी मागायला आली. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational