STORYMIRROR

Sanjay Chhaburao shelke

Inspirational

3  

Sanjay Chhaburao shelke

Inspirational

केल्यानेच होते रे क्रांती मानवा

केल्यानेच होते रे क्रांती मानवा

1 min
148

बडबड तरी किती करतोस रे तू

अर्थ नाही त्याला जगी

केल्यानेच होते रे क्रांती मानवा

पेरल्यानेच येते सुगी... 

स्वार्थी आहे जग हे सारे

तुही तुझा स्वार्थ पहा..

मागल्याने का मिळते काही..

लढण्यासाठी सज्ज रहा

अन्नच हवे भुकेसाठी

ऊपदेशाने ती शमणार कधी......

तुझ्या श्रमांनी दिनही शिनले

शिनूण गेली काळी रात..

होतास जिथे, तु आजही आहेस

तहान भुकेची आहे साथ..

दान मिळेलही मागितल्याने

दानाने जमणार कधी... 

झोपेत येईल स्वप्न तुझ्याही

स्वप्नच आहे ते सत्य नव्हे

राजाही बनशील कुबेरांचा तु

प्रयत्नांनी बन, स्वप्नात नव्हे

ओळख वेड्या तुझ्या शक्तीला

काळही थांबेल पुन्हा जगी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational