STORYMIRROR

Sanjay Chhaburao shelke

Tragedy

3  

Sanjay Chhaburao shelke

Tragedy

आई परतून कधी येशील तू

आई परतून कधी येशील तू

1 min
187

मात्रुत्वाचे लेणे मिळाले,

काय आणखी हवे होते

विसरून गेलो प्रित तुझी गं,

सुरच सारे नवे होते.... 

असतांना तु अर्थ न कळला

आज वाटे हुरहूर मना

विरून गेलीस अंधारी तु

राहिल्या त्या फक्त खुणा

हुंदक्यासाठी आठवणींच्या

अश्रुही मजला हवे होते......

विसरुन गेलो प्रित तुझी गं

सुरच सारे नवे होते..... 

अर्थ न उरला जगण्यालाही

मला किनारा तुटला गं

भरकटली ही नाव सागरी,

अन वादळवारा सुटला गं..

आश्रिताला मिळे सहारा,

तुझ्या पाऊली किनारे होते..

विसरुन गेलो प्रित तुझी गं

सुरच सारे नवे होते... 

तुफान वादळी तुला पाहतो

परतून कधी येशील तू...?

विराण भासे जग हे सारे

कुशीत कधी घेशील तू.....?

लवकर ये गं येतानांही

जगणेही मजला नको होते..

विसरुन गेलो प्रित तुझी गं

सुरच सारे नवे होते.. 

रडता-रडता दिवस गेले,

रात्रीही त्या गेल्या तशा..

अश्रुही आता सरून गेले.

जगणे उरले एक दशा..

अंधार पडतोय दिवसाढवळ्या,

अन् विचित्र सगळे जगणे होते...

विसरुन गेलो प्रित तुझी गं

सुरच सारे नवे होते.. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy