वादळासारखं वागणं तुझ
वादळासारखं वागणं तुझ
सखे, पोळुन निघालेलं जीवन माझं
अजुनही पुर्ण जळलं नाही.
वादळासारखं वागणं तुझं
कधीच मला कळलं नाही..........
नको बोलुस माझ्याशी आता
मला तुझ्याशी बोलायचं नाही.
आभाळाएवढं दु:ख माझं
खरचं तुला पेलायचं नाही.
खुप वेळा झटलो पण...,
प्रेमाचं गणित जुळलं नाही
वादळासारखं वागणं तुझं
कधीच मला कळलं नाही.
फिरलो मी अन् फिरवलसं तु
हरलो मी अन् हरवलसं तु..
वेडे, तुझ्याच फांद्या तोडतांना
काय पण मिळवलस तू...
अंकुर प्रेमाचा करपून गेला
खुरटं झाड फळलं नाही.
वादळासारखं वागणं तुझं
कधीच मला कळलं नाही......
माझी पाऊले एकटीच जातात
अन् नदीच्या किनारी गाणी गातात..
धुंद ती गीतं तुझ्या सोबतीची
विरहाची आज तराणी होतात..
किती दिवस आले-गेले
ओठात गाणं फुललं नाही...
वादळासारखं वागणं तुझं
कधीच मला कळलं नाही..........