STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

पोशिंदा जगायचा कसा..?

पोशिंदा जगायचा कसा..?

1 min
238

निसर्गाची साथ नाही कोणाचा भरोसा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


निसर्ग कोपतो अति बरसतो मेघ

चहूकडे पाणी त्याचे हरवते जग

स्वप्नांची माती उरते ओंजळ न पसा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


खुलते नशीब जेव्हा पिकते शिवार

विश्वासाने पेल बाप डोक्यावर भार

हमी भाव नाही मिळतो दलालाचा फासा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


दुष्काळ कर्जाने झालं डोक्यावर रिन

बळीराजा हतबल जिम्मेदार कोण 

चारी बाजूनं उघडा कसा कणा हा देशाचा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


जगवण्या देश दिन रात तरमळ

डोळ्यांत हो पाणी दाटे ऊरामध्ये कळ

कर्जासह दुःख नशिबी मोबदला असा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


पोरावानी सांभाळल मातीचं हे बाळं

निसर्ग खेळतो कुणी करतंया छळ

मातीत जगणं मरण नाही कुठली आशा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


कष्टकरी राबत होता बळी तुझ्या राणी

आनंदात जगत होता माणूस न प्राणी

झुरतोया अन्नदाता झाली कशी दशा

जगाचा पोशिंदा सांगा जगायचा कसा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational