Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Tragedy

3  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

पोरके प्रश्नं

पोरके प्रश्नं

1 min
303


आली अशी वेळ |प्रश्नचि ठाकले॥

आभाळ झाकले I समस्यांनी ॥


धनाच्या तिजोऱ्या | असे ज्याचे पाशी ॥

समाजाच्या राशी Iतो न येई ॥


न राहे छदाम I त्याचे मोठे मनं ॥

रिकामे दुकान I वाटायाशी ॥


पायाने लंगडा I पैजेसाठी झुरे ॥

आळदांड मरे I आळसाने ॥


विहिरी आटल्या | रान उजाडले ॥

लावे ना झाडे I तरी सुद्धा ॥


नसे भुतदया | धोंड्याला दे मान ॥

पुण्यासाठी दान I मंदीराशी ॥


कोणी केले देवा I असे जात धर्म ॥

कर्मची सद्धर्म Iसांगा येगा ॥


वृद्ध आईबाप । वृद्धाश्रमी टाके ॥

गोष्टी मोठ्या फाके I भाषणात ॥


नार करतसे Iलंगोटीचा वेष ॥

नका देऊ दोष I फॅशन ही ॥


वाड वडीलाशी I नसे मानधान ॥

लावितो लगन | एकलाचि ॥


उरले न जुने | प्रेमाचे निवाडे ॥

कोर्टाचे कवाडे I व्यर्थ व्यय ॥


शेतकरी बाप I रडतो ऋणापायी ॥

पुढाऱ्याची घाई I मतासाठी ॥


सांग विठुराया | किती प्रश्नं मांडू ॥

घेऊन ये दांडू I चमत्कारी ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy