STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

पोकळ कारभार...

पोकळ कारभार...

1 min
7

पोकळ कारभार सारा ,

पोकळच खुलतो डोलारा ,

बिनबुडाच्या तत्वावरी ,

मिरवती ढोल ताशे वाजवत,

राजकारण्यांचा तोरा ...

रात्रीत बदलतात तख्त ,

हेरफेरीत होते मस्त ,

खबर होत नाही ,

या कानांची त्या कानी ,

अशी कडेकोट गस्त...

मुखवटे बदलतात रोज,

सकाळ संध्याकाळी ,

कोण आले कोण गेले खोज,

या संभ्रमातच सामान्य ,

कोण बसलेला भोज...

ऐकुन घ्या मामला ,

ऐवढ्यात नको गवगवा,

झाकली मूठ सव्वा लाखाची,

तेवढीच झाकून बघा,

येईल मागायला मताचा जोगवा ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract