STORYMIRROR

Shila Ambhure

Children

2  

Shila Ambhure

Children

पँँट फाटली

पँँट फाटली

1 min
2.6K




बघा बघा कशी

अंगात दाटली

गजाबा हत्तीची

पॅंटच फाटली।।धृ।।


गजाबाला झाली

खुशी आज न्यारी

घातलीच होती

नवी पॅंट भारी

आनंदाने स्वारी

नाचत सुटली।।1।।


गजाबाने केली

पार्टीची तयारी

नाचाया जमली

मंडळी ती सारी

गजाबाला सर्व

गंमत वाटली।।2।।


पाय उचलून

गजाबा नाचला

टर्रर्र आवाज

साऱ्यांनी ऐकला

हत्तीने मात्र ती

बातच काटली।।3।।


गजाबाला झाले

चित्र सारे स्पष्ट

उमगेना कशी

लपवावी गोष्ट

जिराफाने तर

दवंडी पिटली।।4।।


फाटलेली पँँट

सर्वांनी पाहिली

हत्तीने लाखोळी

शिंप्याला वाहिली

पँँट घालायाची

हौसच फिटली।।5।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children