पण तो आरश्यात का दिसत नाही?
पण तो आरश्यात का दिसत नाही?
आसपासच असतो तो
जाणवत राहतो...
तुलाही आणि मलाही
पण तो आरश्यात का दिसत नाही?
तू कवेत असली की
मनात स्पंदने होतात
तू दूर गेलीस की
असंख्य वेदना होतात
जाणवत राहतो तो
टोचतही राहतो
पण तो आरश्यात का दिसत नाही?
आक्रंदत असतो तो
कधी गालातच हसत असतो
कधी तुझ्या पापणीतून
कधी माझ्या पापणीतून
हळूच गळतही असतो
पण तो आरश्यात का दिसत नाही?
कधी उमगल तुला
तर मलाही सांग सखे
आयुष्याच्या वेलीवरती
प्राजक्त फुलतो ...
गळूनही जातो...
पण तो आरश्यात का दिसत नाही?
का..? तो आरश्यात दिसत नाही..?
